खुशखबर! सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांचा महागाई भत्ता वाढला 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पेंशनधारक आणि  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  खुशखबर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सात टक्के महागाई भत्ता मिळतो. मात्र आता यात दोन टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना  मिळणारा महागाई भत्ता हा तब्बल नऊ टक्क्यांवर नेऊन ठेवला आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर १ जुलैपासून हा निर्णय लागू होईल.

[amazon_link asins=’B075QCNN97′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4966eb12-ab68-11e8-8ba9-6f2ebef7ea8a’]
विशेष म्हणजे, देशभरात ४८ लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी असून  ६१ लाखांपेक्षा जास्त पेंशनधारक आहेत. सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. याआधी मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. ही वाढ १ जानेवारीपासून लागू झाली होती.

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाऊन्स. हा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेंशनधाकरांना मिळते. वाढती महागाई आणि कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर महागाई भत्ता ठरवला जातो.