शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! सरकारच्या मदतीने शेतीसह ‘सोलर’ पावर प्लँट उभारा, २५ वर्ष फिक्स ‘इनकम’ मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना आणत आहे ज्यातून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न कमावू शकतील. आतापर्यंत सोलर पॉवर प्लँट शेती नसलेल्या भागात लावण्यात येत होती. परंतू शेतकरी आता शेतात ५०० किलोमेगा व्हॅट पासून २ मेगाव्हॅटपर्यंत सोलर प्लॅंट लावण्यात येईल. हे प्लॅंट वीज वितरण कंपनीला जोडण्यात येईल आणि प्लँटच्या उत्पादित वीज डिस्कॉमकडे जाईल. यासाठी शेतकऱ्यांचे सोलर प्लँट वीज कंपन्यांच्या ५ किलोमीटर भागात असेल. डिस्कॉमला कोणत्याही परिस्थितीत ही वीज विकत घ्यावी लागेल. यासाठी डिस्कॉम आणि शेतकऱ्यामध्ये २५ वर्षांचा करार होईल.

एमएनआरईच्या मते असे नाही की पॉवर प्लँट फक्त एखादा शेतकरीच सुरु करु शकतो. एवढेच नाही तर अनेक शेतकरी एकत्र येऊन, किंवा शेतकरी संघटना, पंचायत देखील हा पॉवर प्लॅंट सुरु करु शकतात. सध्या हे सोलर प्लॅंट रिकाम्या जमीनीवर लावण्यात येत आहे. आता शेती करत असलेल्या जमीनीवर पिकांच्या वर देखील हे स्ट्रक्चर उभारण्यात येऊ शकते. परंतू शेतकऱ्यांना याची खात्री करावी लागेल की याचा परिणाम शेतावर होणार नाही.

त्यांना सरकारकडून पूर्ण मदत देण्यात येईल. जे शेतकरी स्वता: किंवा समूहाने हे करण्यास सक्षम नसतील, ते सोलर पॉवर प्लँट लावण्यासाठी डेव्हलपर्सची मदत घेऊ शकतात. शेतकरी त्या डेव्हलपर्सला आपली जमीन भाड्याने देखील देऊ शकतात. त्या बदल्यात शेतकऱ्यांना ठरावीक उत्पन्न मिळेल. उत्पादित वीजेचे दर ठरवण्यास शेतकरी मदत करु शकतात आणि डिस्कॉम बिडिंग प्रक्रियेची मदत घेऊ शकतात. परंतू पॉवर परचेज एग्रीमेंट (पीपीए) 25 वर्ष असेल.

सोलर पॉवर प्लँट बसवण्यासाठी लेटर ऑफ एश्योरेंस लागू केल्यानंतर ९ महिन्याच्या आत प्लँट उभारावा लागले.

आरोग्यविषयक वृत्त –