मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची : राजेंद्र कोंढरे 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे ५२ टक्केच्या पुढे गेलेले आहे. ते टिकणार नाही, असा संभ्रम जनतेत आहे. दिलेले आरक्षण टिकवायची जबाबदारी ही सरकारची आहे. येत्या २३ तारखेला आरक्षणावर सुनावणी आहे. तेथे जर का आरक्षणाला स्टे मिळाला तर मराठा समाजाला वेगळा विचार करावा लागेल. कारण मुख्यमंर्त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे जोखमीचे आहे, असे मत सकल मराठा समाजाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले.

कोंढरे हे शहरातील मनोहर सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपतींच्या पुतळ्याचे महिला भगिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक माऊली पवार यांनी केले. या मेळाव्यासाठी २४ जिल्ह्यातून समन्वयक आले होते. पुरूषोत्तम बरडे, नंदाताई शिंदे, डॉ. स्मिता पाटील, निर्मला शेळवणे, लता ढेरे, मनिषा नलावडे, संतोष पवार, राजन जाधव, मनोहर सपाटे, सुहास कदम, गणेश डोंगरे, भाऊ रोडगे, लहु गायकवाड, सुनील शेळके, सुनिल हुंबे, राजाभाऊ काकडे, अंकुश अवताडे, सर्जेराव पाटील, राज पांढरे, मोहन चोपडे, श्रीकांत डांगे, शिवाजी नीळ, प्रकाशडांगे, महादेव गवळी, राम पवार, प्रा. हरिदास गवळी, सुधीर धुत्ताळे, उत्तम शिंदे, प्रवीण देशमुख, प्रकाश ननवरे, सदाशिव पवार, जीवन यादव, निखिल भोसले, सचिन गुंड, प्रियांका डोंगरे, अश्विनी काटे, वैभवी पवार, संजीवनी मुळे, मंगला भादगुले, नलिनी जगताप, शुभांगी लंबे, शोभना सागर, शिल्पा गावडे, माधुरी चव्हाण, रुचिरा चव्हाण, उत्तरा बरडे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मंत्रालयात घुसून झेंडा फडकवणारे भाऊ रोडगे, सुहास कदम, गणेश डोंगरे, राज पांढरे यांचा सत्कार करण्यात आला. कायमस्वरूपी वसतिगृहाचा प्रश्न, आर्थिक विकास महामंडळ मराठा भवन, ॲट्रासिटी कायदा, मेगा नोकर भरती, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयावर चर्चा करणात आली. यावर मान्यवरांनी मतेही व्यक्त केली.

यावेळी बोलताना संजीव भोर-पाटील म्हणाले की, ॲट्रॉसिटी कायद्याबाबत लढण्यापेक्षा सुप्रिम कोर्टात बाजू मांडून याबाबत मार्ग काढता येईल. या कायद्याला खत पाणी घालणारे ही आपलेच बांधव आहेत. त्यांना समजावणं गरजेचे आहे. ॲड. बाळासाहेब सराटे, ॲड. सुहास सावंत (सिंधुदुर्ग), डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), ॲड. स्वाती नकाते (बीड), भानुदास जाधव, रघुनाथ पाटील (पुणे), शांताराम कुंजीर, प्रशांत इंगळे (औरंगाबाद), विजय पवार (उस्मानाबाद), विजय काकडे (औरंगाबाद), संजय पाटील (सांगली), सुधीर भोसले (रत्नागिरी), मनोज पाटील (लातूर), संजय मिस्कीन (मुंबई), नंदा शिंदे, निर्मला शेळवणे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश देशमुख यांनी केले तर राजन जाधव यांनी आभार मानले.