नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा ! राज्यपालांकडून 8 हजार रुपयांच्या मदतीची ‘घोषणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शेतकरी चिंतेत असल्याने अखेर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली आहे. यात दर हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत तर 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी नुकसान भरपाई देण्यात येईल. तर फळबागा आणि बागायतदारांना 18 हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येईल असे राजभवानाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हणले आहे. यामुळे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शाळा आणि कॉलेजची परीक्षा फी माफ
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये म्हणून मुलांची शाळा आणि कॉलेजची परीक्षा फी माफ करण्यात येईल असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसान शेतकरी चिंतित होता, औरंगाबादमधील पिंपरीराजा गावातील शेतीची अवस्था पाहिली तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसते.
ऐन पावसाळ्यात पिक लावणीनंतर आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही परंतू काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पीक धोक्यात आले.

एकीकडे सत्ता स्थापनेचा पेच आणि दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे झालेले नुकसान. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसाच राहिला नाही, मजूरांना द्यायला देखील पैसा राहिला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांकडून राजकीय नेत्यांवर आरोप करण्यात येत होते. माय बाप सरकारकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे.

सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो किलोचे द्राक्ष फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत होती.

Visit : Policenama.com