Governor Appointed MLA | उध्दव ठाकरेंना धक्का ! राज्यपाल कोश्यारींकडून ‘महाविकास’च्या 12 आमदारांची यादी अखेर रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Governor Appointed MLA | तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीसाठी (Governor Appointed MLA) पाठवलेली 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अखेर रद्द (Canceled) केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तशी शिफारस राज्यपालांकडे केली होती. राजभवनातून (Raj Bhavan) शनिवारी सायंकाळी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठवण्यात आली. ठाकरे सरकारने (Thackeray Govt) पाठवलेली ही यादी आता रद्द समजण्यात येत आह, असे राजभवनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

 

राज्यापालांच्या या भूमिकेमुळे लोकप्रिय गायक आनंद शिंदे (Singer Anand Shinde), अनिरुद्ध वनकर (Anirudh Vankar), अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actress Urmila Matondkar) यांचे आमदार होण्याचे स्वप्न तूर्तास तरी भंगले आहे. या यादीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांचेही नाव होते. परंतु, विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत (Legislative Council Elections) त्यांचा विजय झाल्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहिली आहे.

 

ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता (Governor Appointed MLA) दिली नव्हती. मात्र, शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरुन राज्यपालांनी यादी रद्द केल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) नवीन 12 सदस्य नियक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) मान्यतेने नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली जाईल, अशी माहिती आहे.

 

भाजप 8, शिंदे गटाकडून 4 नावे
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) 19 डिसेंबर पासून नागपूरमध्ये सुरु होणार आहे.
या अधिवेशनापूर्वी या 12 जागा भाजप (BJP) -शिंदे गटाकडून (Shinde Group) भरल्या जातील अशी शक्यता आहे.
विधान परिषदेचे सभापती पद सध्या रिक्त आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी 12 पैकी 8 जागा भाजपकडून तर 4 नावे शिंदे गटाकडून दिली
जातील व ही एकत्र यादी पुन्हा राज्यपालांकडे पाठवण्यात येईल.
शिंदे गट कुणाची नावे सुचवणार याबद्दल कुतूहल आहे.
शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तोफा डागू शकतील,
अशा नेत्यांची वर्णी मुख्यमंत्री शिंदे लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

भाजपला सभापतीपद?
विधान परिषदेचे सभापती पद सध्या रिक्त असून अधीचे सभापती आणि राष्ट्रवादीचे आमदार रामराजे निंबाळकर (MLA Ramraje Nimbalkar)
यांच्या जागी भाजपला सभापतीपद हवे आहे. सध्याचे विधान परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता ते शक्य नाही.
मात्र 12 जागा भाजपला मिळाल्यानंतर पक्षाचे विधान परिषदेत 24 आमदार असून दोघांचा भाजपला पाठिंबा आहे.

 

Web Title :- Governor Appointed MLA | governor bhagat singh koshyari canceled the names of 12 members of the legislative council appointed by the governor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा; राजकीय चढाओढीत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप

 

Pune News | बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील कुटुंबाना आगीतून फुफाट्यात जाण्याची भिती

 

Maharashtra Political Crisis | CM एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान; म्हणाले – ‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’