Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल आणि ठाकरे सरकार नवा संघर्ष चिघळणार? राज्यपालांच्या दौऱ्यावेळी पालकमंत्री अनुपस्थित राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन करण्यात आलं. मात्र, तेव्हापासून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेक मुद्यावरून राजकीय वर्तुळात संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य असो अथवा आणखी काही, राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात विविध मुद्द्यांवरुन कलगितुरा रंगला आहे. दरम्यान आता राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल या वादाच्या अंकात आणखी एक भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे 2 दिवस मराठवाड्यातील नांदेड-परभणी- हिंगोली या जिल्हा दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यावेळी या तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) मात्र उपस्थित राहणार नाहीत.

या तिन्ही जिल्ह्याचा दौरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) करणार आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या विभागातील वसतिगृहाचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकार्‍यां समवेत आढावा बैठक देखील घेणार आहेत. काही दिवसापूर्वी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल यांचा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप केला होता. तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात देखील राज्यपालांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नंतर, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यपाल भवनमध्ये भेट घेत मुख्यमंत्र्यांचा निरोप कुंटे यांनी राजभवनला कळवला होता. त्यानंतर राज्यपाल त्यांच्या दौऱ्यात अपेक्षित बदल करतील अशी अपेक्षा असतानाच राज्यपाल यांनी पूर्वनियोजित दौर्‍यात कुठलाही बदल केलेला नाही.

Governor Bhagat Singh Koshyari and mahavikas aghadi absence of guardian minister on governor visit

राज्यपाल यांनी पूर्वनियोजित दौऱ्यात कोणताही बदल न करता आधीची भूमिका ठाम ठेवल्यानं पुढील काळात परत एकदा महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा संघर्ष वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यपालांच्या जिल्हा दौऱ्यावेळी कोळी संबंधित आढावा घेणार असून जिल्हाधिकारी आणि अन्य सर्व प्रशासकीय अधिकारी त्यावेळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच वसतिगृहाचे उद्घाटन देखील करणार आहेत. मात्र, यावेळी पालकमंत्री (Guardian Minister) अनुपस्थित राहणार आहेत. यामुळे आता आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संगितले की, पालकमंत्री यांचे पूर्व नियोजित दौरे असतील. त्यामुळे पालकमंत्री राज्यपाल महोदयांच्या दौऱ्यात नसतील. तर, दुसरीकडे राज्यपाल यांना महाविकास आघाडीच्या वतीने समज दिला असून पुढील कार्यपद्धत बदलतील अशी अपेक्षा देखील मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय.

हे देखील वाचा

Sharad Pawar | शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण

Pune Corporation | भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ‘गोलमाल’; खोटे बिल काढल्याप्रकरणी उपअभियंता टुले निलंबित तर कनिष्ठ अभियंत्याची खातेनिहाय चौकशी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Governor Bhagat Singh Koshyari and mahavikas aghadi absence of guardian minister on governor visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update