… म्हणून भाजपाला मिळू शकते ‘सरकार’ स्थापनेची संधी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कालच फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला, त्यानंतर आता ते राज्यपालांच्या विनंतीनंतर कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहे. परंतू राज्यपाल आता सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजेच भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करु शकतात. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आता राज्यपाल भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभेचे निकाल जेव्हा समोर आले तेव्हा जनतेने कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. युतीला बहुमत दिले परंतू भाजप शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु आहे. परंतू राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिल्यानंतर देखील भाजप सरकार स्थापनेत तयार नसल्याची माहिती आहे. असे असताना भाजप आणि शिवसेनेतील तिढा मात्र कायम आहे. त्यामुळे आता पुढाकर कोण घेणार या बाबत संभ्रम आहे. त्यामुळे जनतेला अजून किती वाट पाहावी लागणार अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेवर टीका केली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला, यामुळे युतीतील संबंधित ताणल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे संजय राऊतांनी काल दोनदा शरद पवारांची भेट घेतली दरम्यान काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात काल शरद पवार केंद्रस्थानी होती. शरद पवारांच्या निवास्थानी सत्ताची खलबत सुरु असल्याचे बोलले जात होते. परंतू शरद पवारांनी यांनी आज देखील आपण विरोधी पक्षातच बसणार याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्याचा निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येसंबंधित दिलेल्या निकालाचा राज्यातील राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. अयोध्येच्या निकालावरुन महाराष्ट्रातील राजकारण बदलणार नसल्याचे सांगत लोक दोन तीन दिवसात हे विसरुन जातील असे देखील सांगितले. राज्यातील परिस्थितीवर बोलताना शरद पवार म्हणाले की पुन्हा एकदा सांगतो की ज्याला बहुमत मिळालं आहे त्यांनी सरकार बनवावं, युतीला जनतेने कौल दिला आहे तर प्रभावी विरोधी पक्ष ही आमची जबाबदारी आहे.

Visit : Policenama.com