Governor Bhagat Singh Koshyari | ‘मी चुकीच्या ठिकाणी आलो, राजपाल बनणं म्हणे दु:खच’, राज्यपालांनी व्यक्त केली मनातील खदखद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे कायमच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहीले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यपाल पद हे माझ्यासाठी अयोग्य असून राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही, असे सांगत राज्यापालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. शनिवारी राजभवन येथे झालेल्या एका कर्यक्रमात ते बोलत होते.

 

राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा आणि तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण शनिवारी राजभवन येथे विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी (Shri Vishweshwaranand Giriji) यांच्या हस्ते झाले. यावेळी मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह व मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दुखं आहे,
यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे.
पंरतू मी 80 वर्षाचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत.
मात्र जेव्हा संन्यासी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

 

छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad), भगतसिंग (Bhagat Singh),
नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose), लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak)
जन्माला यावे, परंतु आपल्या घरात नाही, तर शेजारच्या घरात, अशी लोकांची भावना आहे,
असेही कोश्यारी यांनी म्हटले. राज्यपालांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राज्यपाल लवकरच महाराष्ट्रातून जातील,
त्यांना पदमुक्त केले जाईल अशी चर्चा रंगत आहे.

 

Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari | finally the governor bhagatsingh koshyari spoke clearly and clearly said what was in his heart

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक