Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा अडचणीत?, हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ‘फौजदारी रिट’ याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि मराठी माणसांचा अपमान केल्याप्रकरणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 (सुधारित) कलम 3 (1) (v) अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आधीच राज्यात ‘राज्यपाल हटाओ’ मोहीम विरोधी पक्षांनी सुरु केली आहे.
त्यात ही याचिका दाखल झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या
वक्तव्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
याचिकाकर्ता रमा अरविंद यांच्या वतीने अॅड. अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

 

एकीकडे विरोधी पक्षांतील नेते राज्यपालांचा राजीनामा मागत आहेत,
तर दुसरीकडे राज्यपाल यांनी मला आपल्या राज्यात उत्तराखंड मध्ये परत जायचे आहे, असे म्हंटले आहे.
तसेच त्यांनी दिल्लीत पक्षांच्या प्रमुखांची देखील भेट घेतली आहे.
त्यामुळे आागामी काळात राज्यापालांचे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे.

 

Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari | governor bhagat singh koshyari and bjp mp sudhanshu trivedi writ petition has been filed in bombay high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा दुसरा विजय, हेमंत पाटील संघाची विजयी सलामी !