Governor Bhagat Singh Koshyari | उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजीनाम्याची तयारी

0
292
Governor Bhagat Singh Koshyari | governor bhagat singh koshyari ready to resign speaks with pm modi
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली होती. यानंतर आता स्वत: कोश्यारी राजीनामा द्यायची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे व्यक्त केली आहे. यासंदर्भात राजभवनाकडून (Raj Bhavan) माहिती देण्यात आली आहे.

राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन आणि मनन करण्यात घालवायचा आपला मानस आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवल्याची माहिती गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र (Governor of Maharashtra) या अधिकृत ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा
बहुमान मिळणे, हे माझ्याकरिता अहोभाग्य आहे.
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता
येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून
मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे.
आणि अशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,
असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या मनोगतात म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धी
पत्रकात म्हटले आहे.

Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari | governor bhagat singh koshyari ready to resign speaks with pm modi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांना अधिकार नाही,’ या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले…

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात