Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे राज्यपाल पदावरून पदमुक्त होणार अशी चर्चा माध्यमांवर सुरु आहे. कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही म्हटले जात आहे. पण, राजभवनाने या वृत्ताचे खंडन केले आहे.

 

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही,” असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

 

राज्यपालांच्या पदमुक्तीचे वृत्त खरे ठरण्याआधीच शिवसेनेकडून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. “राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!” असे त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहिले आहे.

 

Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari | rajbhavan maharashtra rejected governor bhagatsingh koshyari desire to resign

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले