Governor Bhagat Singh Koshyari Resignation Approved | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhagat Singh Koshyari Resign | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्याने ( Bhagat Singh Koshyari Resign) रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Maharashtra New Governor Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील 13 राज्यांमध्ये रविवारी (दि.12) फेबरबदल करण्यात आले आहेत. झारखंड चे राज्यपाल (Governor of Jharkhand) म्हणून काम पाहणारे रमेश बैस हे लवकरच माहाराष्ट्राचा पदभार स्वीकारणार आहेत.

 

 

महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी हे मागच्या अनेक महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत आपला राजीनामा ( Bhagat Singh Koshyari Resign) दिला होता. अखेर राष्ट्रपतींनी कोश्यारी यांचा रविवारी राजीनामा स्वीकार करुन त्यांना पदमुक्त केले.

 

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर राष्ट्रपतींकडून त्रिपुरा आणि झारखंडसारख्या राज्यांच्या राज्यपलपादाची जबाबदारी सांभाळलेल्या अनुभवी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

 

 

राज्यपाल रमेश बैस यांची कारकीर्द

रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड मधील रायपूर येथे झाला आहे. ते सात वेळा खासदार (MP) म्हणून निवडून आले असून दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Late Prime Minister Atal Bihari Vajpayee) यांच्या मंत्रीमंडळात होते. परंतु 2019 मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राजपाल (Governor of Tripura) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याठिकाणी दोन वर्ष काम पाहिल्यानंतर 2021 मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari’s resignation accepted; Ramesh Bais appointed as Governor of Maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jalgaon Crime News | रंग आणण्यासाठी गेलेल्या 2 जिवलग मित्रांवर काळाची झडप; जळगावमधील घटना

Amruta Khanvilkar | नवऱ्याबरोबर राहत नसलेल्या चर्चांवर अमृता खानविलकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाली….

Sanjay Dutt And Manyata Dutt | पत्नी मान्यता बरोबर रोमँटिक डान्स केल्याने संजय दत्त झाला ट्रोल

Amrawati Crime News | बाईक अपघातात बापाच्या डोळ्यादेखत 20 वर्षीय मुलाचा मृत्यू; अमरावतीमधील घटना

Aurangabad Crime News | आरोपी दिराकडून वहिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; औरंगाबादमधील घटना

All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा;
बँक ऑफ बरोडा, एअर इंडिया संघांचे एकतर्फी विजय