Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 80 व्या वर्षी केला सिंहगड ‘पार’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे 15 आणि 16 ऑगस्ट या दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. 15 ऑगस्ट ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहन सोहळा पार पडला. त्यांनतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या संकल्पनेतून आंबेगाव या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट दिली. त्यानंतर आज (सोमवारी) शिवनेरीनंतर त्यांनी सिंहगडाला (Sihagad) भेट दिली. वयाच्या 80 व्या वर्षी कोश्यारी यांनी चालत सिंहगड पार केला आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  हे आज सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, ‘माझ्या राजकीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती, बुद्धी, शक्तीच गुणगान इतिहासकारांनी केलं आहे. युक्ती बुद्धी शक्तीने राज्य केलं. शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आहे. तानाजी मालुसरे यांचा इतिहास मुलांना समजला पाहिजे, तो शिक्षणात आला पाहिजे. आपली मुले तानाजी मालुसरे बनले पाहिजेत, असं त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, सिंहगडावर (Sihagad) राहणार्‍या नागरिकांनी राज्यपाल येणार्‍या मार्गावर रांगोळ्या
काढून तर एका ठिकाणी काही महिलांनी त्यांची आरती ओवाळून स्वागत केले आहे. तसेच त्यावेळी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी तेथील नागरिकांची विचारपूस देखील केलीय. ”कसे आहात तुम्ही, आमच्या उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे, असं त्यांनी नागरिकांना म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

PM Kisan | शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपयांऐवजी येतील 4000 रुपये! सरकार वाढवणार आहे योजनेची रक्कम?

Vinayak Raut | ‘नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही’


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : governor bhagat singh koshyari visit sinhagad fort pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update