विधान परिषद : खडसे, बांदेकर, सरदेसाई, तांबे यांच्यासह राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी ‘या’ 17 नावांची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या (MLAs directed by the Governor on the Legislative Council) नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त लागण्याची चिन्हं आहेत. तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंसह आदेश बांदेकर, आशिष देशमुख, वरुण सरदेसाई, सत्यजित तांबे, सचिन सावंत, सचिन अहिर अशा 17 जणांच्या नावांची चर्चा आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे अशी माहिती आहे. या जागा जून महिन्यापासून रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या लांबल्या होत्या.

कुणाकुणाची नावं चर्चेत ?

शिवसेना –
1) सुनील शिंदे (Sunil Shinde) – वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी (Aaditya Thackeray) जागा सोडली.

2) आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) – शिवसेना नेते, श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर माहिममधून पराभव

3) सचिन अहिर (Sachin Ahir) – 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याचं बक्षीस म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता

4) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) – सलग 3 वेळा शिरूरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं.

5) वरून सरदेसाई (Varun Sardesai) – युवासेना सरचिटणीस

6) राहुल कनाल (Rahul Kanal) – युवासेना पदाधिकारी

7) सुरज चव्हाण (Suraj Chavan) – युवासेना पदाधिकारी

यापैकी वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण यांच्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जातं.

राष्ट्रवादी –
1) एकनाथ खडसे (Eknath Khadse) –
भाजपचा राजीनामा देऊन नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित

2) शिवाजी गर्जे (Shivaji Garje) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात.

3) आदिती नलावडे (Aditi Nalawade) – मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्षा व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय

4) राजू शेट्टी (Raju Shetti) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.

5) आनंद शिंदे (Anand Shinde) – प्रसिद्ध गायक शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जात आहे.

काँग्रेस –
1) सचिन सावंत (Sachin Sawant) –
कँग्रेस प्रवक्ते

2) आशिष देशमुख (Ashish Deshmukh) – नागपूरमधील काटोलचे माजी आमदार. भाजपला राम राम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश

3) नसीम खान (Naseem Khan) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री

4) मोहन जोशी (Mohan Joshi) – माजी विधानपरिषद आमदार, 2019 मध्ये पुण्यातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव

5) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) – महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांसाठी कोणते निकष असतात ?
कला, वाड्मय विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करू शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेत (Maharashtra Legislative Council) 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना (Governor) अधिकार आहेत. मंत्रिमंडळातून (Cabinet) शिफारस करण्यात आलेली नावं राज्यपालांकडून स्विकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

You might also like