Governor vs Thackeray Government | राज्यपालांकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का; विशेषाधिकार वापरत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Governor vs Thackeray Government | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि ठाकरे सरकार (Thackeray Government) यांच्यात प्रत्येक बाबींवरुन संघर्ष होताना दिसत आहे. आता राज्यपालांनी राज्य शासनाला आणखी एक धक्का दिला आहे. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमधील अग्नीकांडात १४ जणांचा मृत्यु झाला होता (Ahmednagar District Hospital Fire Case). या प्रकरणी राज्य शासनाने शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (District Surgeon Dr. Sunil Pokharna ) यांना निलंबित (Suspended) केले होते. त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. १४ जणांच्या बळी गेलेल्या घटनेत राज्यपालांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आपल्या विशेषाधिकाराचा (Privilege) वापर केल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे. (Governor vs Thackeray Government)

 

नगरमधील जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये ६ नोव्हेंबर रोजी सकाळी आग लागली होती. त्यात १४ कोरोना रुग्णांचा बळी गेला होता.
या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख व चन्ना आनंद या चौघांना अटक केली.
त्यानंतर आरोग्य विभागाने या चौघांसह डॉ. ढाकणे यांनाही निलंबित केले.
काही दिवसांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनाही निलंबित करण्यात आले. (Governor vs Thackeray Government)

 

तेव्हापासून डॉ. सुनील पोखरणा यांना वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे अर्ज केला होता.
सार्वजनिक आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
त्यांना शिरुर येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्यपालांच्या सूचनेनुसार निलंबन रद्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ मधील चारच्या पोटनियम पाच खंड (क) अन्वये राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे निलंबन रद्द करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या अग्नीकांडामध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या डॉ. विशाखा शिंदे (Dr Vishakha Shinde Ahmednagar) या आरोग्य विभागाच्या कर्मचारी नसल्याचे, तया पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रुग्णालयात असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यामुळे त्यांच्यावरील तसेच डॉ. ढाकणे यांच्यावरील कारवाई यापूर्वीच मागे घेण्यात आली होती.
ढाकणे यांची विभागीय चौकशी सुरु आहे. सपना पठारे यांची विभागीय चौकशी सुरु आहे.

 

आस्मा शेख, चन्ना आनंद हे कंत्राटी कर्मचारी असल्याने त्यांच्या नोकरीवर संकट आले.
त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य शासन यांच्यामध्ये प्रत्येक बाबीवर संघर्ष होताना दिसत आहे.
राज्य शासनाच्या निलंबन कारवाई विरोधात कोणत्याही राज्यपालाने आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन त्यात हस्तक्षेप केल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Governor vs Thackeray Government | Maharashtra governor bhagat singh koshyari cancels another decision of thackeray government regarding Ahmednagar District Hospital Fire Case suspension of District Surgeon Dr. Sunil Pokharna

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा