शिवतीर्थावर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी बाबत राज्यपाल कोश्यारींचं ‘मत’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजी पार्कवर काल ठाकरे कुटुंबातील पहिल्या व्यक्तीने अर्थात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. इतर राज्यातील अनेक मंत्री आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र झालेल्या कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्यापूर्वी अनेक नेत्यांनी नावे घेतली आणि हे प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. तसेच या समारंभात सरकारी यंत्रणेला सहभागी करून न घेतल्यामुळे देखील राज्यपाल नाराज होते. शपथ घेताना मंचावर सरकारी यंत्रणांना काहीही करू दिले नाही, त्यामुळे देखील बऱ्याच त्रुटी होत्या असे देखील राज्यपाल म्हणाले. तसेच शपथ विधिदरम्यान अनेक नेत्यांची देखील नावे घेतल्याने राज्यपाल नाराज होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखो जनसमुदायाच्या साक्षीने काल शपथ घेतली यानंतर त्यांनी जनसमुदायाला अभिवादन करताना मंचावर नतमस्तक होऊन जनतेचे आभार मानले. तसेच ज्यावेळी ते शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले त्यावेळी जमलेल्या समुदायाने देखील जोशात या दृश्याचे स्वागत केले. उद्धव ठाकरेंनंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, छगन भुजबळ काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

Visit : Policenama.com