एकनाथ खडसे यांच्या ‘जनसेवे’ला राज्यपाल कोश्यारी यांची पोच’पावती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपला सोडचि्ठी देऊन राष्ट्रवादीचे घडयाळ हातात बांधलेले उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Senior leader Eknath Khadse) यांच्या जनसेवेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी( Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पोच पावती दिली आहे. त्यासाठी निमित्त ठरले ते खडसे यांच्या वरील आलेले पुस्तक ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे’ हे डॉक्टर सुनील नेवे यांनी लिहिलेले पुस्तक.

या पुस्तकाच्या माध्यमातून खडसे यांचे व्यक्तिमत्व, समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून केलेले योगदान यासह व्यापक सेवाकार्याचा अभ्यासपूर्ण आलेख या मांडण्यात आला आहे असे, राज्यपाल कोश्यारी यांनी खडसे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन करतो, तसेच सुयश चिंतितो असेही राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी समाजकारण या क्षेत्रातून पाठवण्यात आले आहे.

You might also like