आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी राज्यपालांना झटका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आचार संहितेच्या उल्लंघन प्रकरणी राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह हे अडचणीत आले आहेत. दरम्यान, कल्याण सिंह यांनी आचार संहितेचे उल्लंघन केले असून त्याचा रिपोर्ट राष्ट्रपतीकडे दिला असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर राष्ट्रपतींनी त्याचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला असल्याचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे. 
कल्याण सिंह यांनी २३ मार्चला अलिगढमध्ये नरेंद्र मोदींचे समर्थन करत मी भाजपचा कार्यकर्ता आहे. नरेंद्र मोदींची देशाला गरज असून त्यांना पुन्हा एकदा निवडणून देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यामुळे कल्याण सिंह यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे ते अडचणीत आले होते.
यावर कल्याण सिंह यांनी आचार संहितेचे उल्लंघन केले असून त्याचा रिपोर्ट राष्ट्रपतीकडे दिला असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर राष्ट्रपतींनीही त्याचा अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे.