गोविंद कृपा हॉस्पिटलच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील गोविंद कृपा हॉस्पिटलच्या वतीने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .सुमारे 105 महिलांची मोफत रक्त व आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला. प्रसुती तज्ञ असलेल्या डॉ. श्रीधर दायमा यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले.

आरोग्य शिबीर उद्घाटन महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ वेदिका होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप या उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर श्रीधर दायमा यांनी महिलांना भेडसावणारे विविध आजार यावर मार्गदर्शन केले. नुकतीच न्यायाधीश पदी येथील एडवोकेट श्वेता घोडके यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सत्कार यावेळी संपन्न झाला.

या आरोग्य शिबिरात प्रसंगी सौ अनिता डागा, सौ प्रतिभा चोथानी, सौ स्नेहल ब्रम्हेचा , स्मिता कुलकर्णी, सौ भारती भांबारे, वैशाली आब्बड , सौ शिरीन शेख उपस्थित होत्या. यावेळी सुमारे 105 महिलांची रक्त व आरोग्याची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बुब व प्रतिभा दायमा यांनी केले आभार डॉ. श्रीधर दायमा यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like