Govind Pansare Murder Case | गोविंद पानसरे हत्येप्रकरणी 10 जणांवर दोष निश्चिती, समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह इतर संशयितांचा समावेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या केल्या प्रकरणी (Govind Pansare Murder Case) कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने (Kolhapur District Court) सोमवारी (दि.9) 10 संशयितांवर दोष निश्चिती करण्यात आली. यामध्ये समीर गायकवाड (Sameer Gaikwad), वीरेंद्रसिंह तावडे (Virender Singh Tawde) यांच्यासह इतर संशयितांचा समावेश आहे. दोष निश्चिती (Convicted) झाल्यामुळे पानसरे हत्या खटल्याच्या प्रकरणाला (Govind Pansare Murder Case)  वेग येणार आहे. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.

 

गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर एसआयटीने (SIT) तपास करुन 12 संशयितांवर गुन्हा (FIR) दाखल केला. एसआयटीच्या तापसानंतर हा गुन्हा एटीएसकडे (ATS) वर्ग करण्यात आला. एटीएसकडूनही तपास सुरु आहे. दरम्यान, गुन्ह्यातील दहा संशयितांवर सोमवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश तिसरे एस.एस. तांबे (District Judge 3rd S.S.Tambe) यांच्यासमोर दोष निश्चित करण्यात आली.

 

न्यायाधीश तांबे यांनी सर्व संशयितांना आरोपाबद्दल विचारणा केली. सर्व संशयितांनी आरोप नाकारले.
त्यांच्यावर दोष निश्चिती करण्यास न्यायालयाने परवानगी दिली. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.
पुढील सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदार यांची यादी सादर केली जाणार आहे,
अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे (Special Public Prosecutor Shivajirao Rane) यांनी दिली.

 

Web Title :- Govind Pansare Murder Case | 10 people convicted in Govind Pansare murder case, Sameer Gaikwad, Virender Singh Tawde and other suspects included

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…

MP Arvind Sawant | ‘राज्यातील सरकार घटनाबाह्य’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर घणाघात