हॉटेलमध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत सापडला होता गोविंदा, पत्नीला समजल्यावर झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 1990 च्या दशकात राणी मुखर्जी आणि गोविंदाची जोडी खूप हिट ठरली. प्रेक्षकांनादेखील ही जोडी एवढी आवडली की, लोक त्यांना लग्न करण्याचा सल्ला देऊ लागले. रिअल लाईफमध्येही दोघांमध्ये खूप प्रेम दिसत होतं. ते नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असत. सेटवरही दोघे खूप बोलायचे नेहमीच सोबत असायचे. समोर आलेल्या वृत्तांनुसार दोघांमधील जवळीकता खूपच वाढली होती. त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये रात्र घालवली होती. गोविंदाच्या एका चुकीमुळे त्याच्या मुक्कामाविषयी मीडियाला चाहूल लागली. मीडियाने दोघांनाही नको त्या अवस्थेत स्पॉट केले.

होय. या वृत्तावर वास्तविक पाहता शिक्कामोर्तब झालेले नाही परंतु असं म्हटलं जातं की, याबाबत जेव्हा गोविंदाच्या पत्नीला माहिती मिळाली तेव्हा ती खूपच संतप्त झाली. त्यामुळे ती मुलांना घेऊन घर सोडूनही गेली. अशी माहिती समजत आहे की गोविंदाने राणीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. अनेकदा जवळकीता दाखवली परंतु यानंतरही राणीसोबत गोविंदाचं खास कनेक्शन झालं नाही. अखेर गोविंदाने आपल्या पत्नीला मनवले.

अशाही बातम्या समोर येत होत्या की, राणी मुखर्जी गोविंदासोबत लग्न करण्यासाठी तयार होती. परंतु गोविंदाची पत्नी आणि त्याची दोन मुले त्याच्या लाईफमध्ये महत्त्वाची होती. त्यानंतर हळूहळू राणीने गोविंदासोबत ब्रेकअप केलं आणि गोविंदाही आपल्या पत्नीकडे परत गेला.

Visit : Policenama.com