Video : गोविंदा आणि गणेश आचार्यचा बर्थडे पार्टीत धमाकेदार डान्स; सेलिब्रिटींचीही हजेरी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेता गोविंदाने सोमवारी २१ डिसेंबरला आपला बर्थडे सेलिब्रेट केला. ही मिडनाइट बर्थडे सेलिब्रेशन पार्टी त्याची पत्नी सुनीता आहुजाने ऑर्गनाइज केली होती. या पार्टीला गोविंदाचे जवळचे मित्र आणि काही सेलिब्रिटीही आले होते.

यावेळी आपल्या ९० च्या दशकातील हिट गाण्यांवर जोरदार डान्स केला. त्याचं घर पार्टीसाठी सजवण्यात आलं होतं. सेलिब्रेशनबाबत गोविंदाने सांगितले की, ‘माझ्या पत्नीने माझ्यासाठी बर्थडे पार्टीचं आयोजन केलं आहे ज्यात माझ्या सर्वच मित्रांना बोलवण्यात आलं होतं.

 

 

यावेळी बोलताना गोविंदा म्हणाला की, राजपाल यादव, रवि किशन, अरमान कोहली, गणेश आचार्य, शक्ति कपूर पार्टीत आले होते. माझ्या वेगवेगळ्या गाण्यांवर आम्ही डान्स केला. जेव्हा सकाळी ६ वाजता दुधवाल्याने बेल वाजवली आम्ही तेव्हाच थांबलो. मी देवाला प्रार्थना करतो की, जगातून आता सुरू असलेली महामारी निघून जावी आणि आपण सगळे २०२१ मध्ये नॉर्मल होऊ’. २०२० संपणार आहे. येणारं वर्ष चांगलं असेल.