Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कित्येक दिवसापासून अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. बॉलीवूडमध्ये आजपर्यंत प्रेमाचे त्रिकोण दाखवले गेले आहेत हाच फॉर्मुला एका नव्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Govinda Naam Mera)

 

ट्रेलर ची सुरुवात थोडासा मजेदार पद्धतीने होताना दिसत आहे. त्यानंतर ट्रेलर थोडासा गंभीर बनत जातो. ट्रेलर मध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या काही विनोदी प्रसंग दाखवण्यात आले आहेत. तर विकी कौशलची पत्नी म्हणून भूमी पेडणेकर भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे कियारा (Kiara Advani) सोबत रोमान्स करताना ही विकी दिसणार आहे. सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची झलक देखील या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तरी असं दिसत आहे हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असेल. (Govinda Naam Mera)

 

हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) वर प्रदर्शित होणार आहे.
शशांक खैतान (Shashank Khaitan) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
तर करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनने (Dharma Production) याची निर्मिती केली आहे.
पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना आतुरता लागली आहे या चित्रपटाची.

 

Web Title :- Govinda Naam Mera | bollywood film govinda naam mera trailer vicky kaushal kiara advani bhumi pednekar movie released on ott

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘पत्रकार मुली साड्या का नाही नेसत?’ विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

Sanjay Raut | राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; शिवसेना खासदार म्हणाले – ‘हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय…’

Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल