Govinda Naam Mera | भेटा विकी कौशलच्या ‘नॉटी गर्लफ्रेंड’ला ! कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर आणि विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’चं पहिलं पोस्टर रिलीज

पोलीसनामा ऑनलाइन – Govinda Naam Mera | करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने नुकतेच ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये विकी कौशल ( Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत आहे. गोविंदा वाघमारेच्या भूमिकेत विकी कौशल, तर भूमी पेडणेकरला (Bhumi Pednekar) त्याची ‘हॉटी पत्नी’ मिसेस वाघमारे आणि कियारा अडवाणीला (Kiara Advani) त्याची ‘खट्याळ मैत्रीण’ म्हणून सामील करण्यात आले आहे. विकी कौशल आणि भूमी पेडणेकर या आधीही एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते आणि त्याचप्रमाणे कौशल आणि कियारा अडवाणी देखील एका वेब सिरीज मध्ये पाहायला मिळाले होते.

गोविंदा वाघमारेच्या भूमिकेत विकी कौशलचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना करण जोहरने लिहले ‘भेटा गोविंदा वाघमारेला’ ! हार्ट ऑफ गोल्ड अँड डान्स मूव्हस आर बोल्ड! गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट तुम्हाला पोट धरून हसायला लावेल असे चित्रपटाचा पोस्टर शेअर करताना करण जोहर म्हणाला.

Sangli News | एकरकमी FRP चे आंदोलन सांगली जिल्ह्यात हिसंक वळणावर; राजारामबापू, क्रांती साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविले

करण जोहर, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी या सर्वांनीच ‘गोविंदा नाम मेरा’ चे फर्स्ट पोस्टर सोशल मीडिया वर शेअर केले. कियारा अडवाणी ने विकी कौशल चा फोटो शेअर करताना लिहले; ” आजकाल यांचे आणि माझे चर्चे प्रत्येकाच्याच तोंडी आहेत. सर्वांना अजून माहीत नाही, पण तुह्माला 10 जून 2022 ला नक्की कळेल!” (Govinda Naam Mera)

भूमी पेडणेकरच्या पोस्टर बद्दल तिने लिहले,

” जेव्हा ही तुमच्या आसपास असते, तेव्हा तिथे शांतता बिलकुल नसते. भेटा सौ. वाघमारे यांना!”

 

 

 

स्वतःच्या पोस्टर बद्दल तिने लिहले,

” आणि ही आहे मी!

या कहानीला जो मसाला आणि तडका पाहिजे तो माझ्यात आहे ”

‘गोविंदा नाम मेरा ‘चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. हा चित्रपट 10 जून 2022 ला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हे देखील वाचा

Youtube | यूट्यूब व्हिडिओवर आता डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही

Hybrid Fund | ‘हायब्रिड फंड’ कशाला म्हणतात, जाणून घ्या त्यामधील गुंतवणुकीचे फायदे?

India’s GDP | भारताच्या GDP मध्ये 2050 पर्यंत होईल 406 अरब डॉलरची वाढ, 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळेल नोकरी; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील न्यायालयात बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटवर गुन्हे शाखेची ‘धाड’; सात जणांना अटक

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Govinda Naam Mera | vicky kaushal announces govinda naam mera bhumi pednekar kiara advani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update