‘सारा-वरुण’च्या ‘कुली नंबर 1’वर गोविंदानं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आणि गोविंदा आणि डेविड धवन इंडस्ट्रीत खूप फेमस आहेत. एकेकाळी सोबत असणारी ही जोडी आज सोबत नाही. गोविंदानं अनकेदा डेविडवर हल्लाबोल केला आहे. यांच्या भांडणाचा त्यांच्या कौंटुबिक नात्यावर काहीच परिणाम झाला नाही असं दिसत आहे. वरुण धवन अनेकदा आपल्या मुलाखतीत म्हणाला आहे की, त्याला गोविंदासारखं व्हायचं आहे.

लवकरच कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमधून सारा अली खान आणि वरुण धवन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतीच गोविंदानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

Iss Diwali 💛 main hoon coolie no 1

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

गोविंदानं अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत सारा अली खान आणि वरुण धवन सहित कुली नंबर वन सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. गोविंदा म्हणाला, “मी वरूणला ऑल द बेस्ट म्हणू इच्छितो. जेव्हा एखादा ज्युनियर कलाकार इज्जत देतो तेव्हा खूप चांगलं वाटतं. आम्ही जेव्हा नवीन होतो तेव्हा आम्हीही सीनीयर्सचा असाच सन्मान करायचो. मी जेव्हा टुर्सला जातो तेव्हा लोक म्हणतात तो कलाकार म्हणत होता की त्याला तुमच्यासारखं व्हायचं आहे, तेव्हा मला चांगलं वाटतं”

कुली नंबर वन सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सारा आणि वरुण या सिनेमात लिड रोलमध्ये आहेत. या सिनेमात ओरिजिनल कुली नंबर वन सिनेमातील दोन सुपरहिट गाणी ठेवण्यात आली आहेत. सारा आणि वरुण या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत.

 

You might also like