प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या पुतण्याचा संशयास्पद मृत्यू 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता गोविंदाचा पुतण्या जन्मेंद्र (३४) याचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी मुंबईतील यारी रोड स्थित अपार्टमेंटमध्ये आढळून आला. जन्मेंद्रचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी जन्मेंद्र याचा भाऊ कृष्णा अभिषेकाची बायको कश्मीरा शाहने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले त्याचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला.

कोण आहे जन्मेंद्र

 

जन्मेंद्र हा गोविंदाचा मोठा भाऊ आणि निर्माता-दिग्दर्शक कीर्ति कुमार यांचा सावत्र मुलगा होता. जन्मेंद्रहा सुद्धा दिग्दर्शक होता. त्याने ‘प्यार दिवाना होता है’ चित्रपटसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. त्याला प्रेमाने डम्पी आहूजा म्हणत होते आणि त्याचे फेसबुक अकाऊंटही याच नावाने आहे.

२००६ मध्ये महिलेशी गैरवर्तवणूक आणि तिच्या नवऱ्याला मारल्या प्रकरणी त्याच्यावर आणि त्याच्या चार मित्रांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

छेडछाडीला कंटाळून १६ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या