‘ब्लॅक फंगस’चा सामना कोविडमधून ठिक झालेल्या रूग्णांनी कसा करावा? वाचा सरकारची अ‍ॅडव्हायजरी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट घातक झाली आहे. तर, कोविड-19 मधून ठिक झालेल्या काही लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा जीवघेणा संसर्ग समोर आला आहे. यास ब्लॅक फंगस किंवा म्यूकरमायकोसिस म्हणतात. या घातक संसर्गासाठी सरकारने अ‍ॅडव्हायजरी जारी केली असून या ब्लॅक फंगसचा सामना कसा करावा हे सांगितले आहे, ही अ‍ॅडव्हायजरी जाणून घेवूयात…

म्यूकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगसची लक्षणे
* नाक बंद होणे
* नाक आणि डोळ्यांच्या जवळपास वेदना आणि लाल होणे
* ताप, डोकेदुखी आणि खोकला
* धाप लागणे आणि रक्ताची उलटी
* मानसिक अस्वस्थता, कन्फ्यूजनची स्थिती

कसा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा संसर्ग ?
* अनियंत्रित शुगर असलेल्या लोकांना
* स्टेरॉईडच्या वापराने रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने
* मोठ्या कालावधीपर्यंत आयसीयूमध्ये राहणे
* एखाद्या गंभीर आजाराने पीडित होणे
* वोरिकोनाजोल थेरेपी

कोविड सर्व्हायवर्सने हे लक्षात ठेवावे
* हायपरग्लायसिमियावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
* कोरोनातून बरे झाल्यानंतर डायबिटिक रूग्णांनी ब्लड ग्लुकोज लेव्हल चेक करत राहणे.
* स्टेरॉईड घेताना योग्य वेळ, योग्य डोस आणि कालावधी लक्षात ठेवा.
* ऑक्सीजन थेरेपीच्या दरम्यान स्वच्छ पाण्याचा वापर करा.
* अँटीबायोटिक्स अणि अँटीफंगलच्या वापरावेळी सावधगिरी बाळगा.

काय करू नये
* कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
* कोविडच्या उपचारानंतर नाक बंद होण्याला बॅक्टेरियल सायनसिटिस समजू नका.
* कोणतेही लक्षण दिसून आल्यास तपासणी करा.
* म्यूकरमायकोसिसचा उपचार स्वताच करण्यात वेळ घालवू नका.

ही सावधगिरी बाळगा
* धुळीच्या ठिकाणी मास्क आवश्य घाला.
* गार्डनिंग किंवा मातीत काम करतान शूज, हात-पाय झाकणारे कपडे, ग्लव्हज वापरा.
* रोज आंघोळ करा आणि स्वच्छतेकडे लक्ष ठेवा.