COVID-19 : आता घर बसल्या मिळणार ‘औषधं’, सरकारनं दिली होम डिलिव्हरीची ‘परवानगी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसला समोर ठेवून भारत सरकारने लोकांना औषधांची डिलिव्हरी घरापर्यंत पोहोचवण्याची परवानगी दिली असून लवकरच सरकारकडून यासंबंधी आदेश जारी केला जाईल. तर एकीकडे आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले की, १७ राज्यांनी कोरोनाने संक्रमित रुग्णांचा उपचार पूर्णपणे समर्पित रुग्णालये म्हणून चिन्हांकित करण्याचे काम सुरु केले आहे.

कोरोना व्हायरसबाबत मीडियाला माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, “अद्याप हे सांगण्याचा कोणताही पुरावा नाहीये कि भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार समुदाय पातळीवर होत आहे.” त्यांनी हेही नाकारले कि हा व्हायरस मच्छरांमुळे पसरतो.

भारत आव्हान पेलण्यास सज्ज

सामान्य जनतेला आश्वासन देत अग्रवाल म्हणाले कि भारत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे. तर एकीकडे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, राज्य सरकारच्या बैठकीत प्रवासी बंदीबाबत चर्चा झाली असून लवकरच ती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल. अग्रवाल म्हटले की, ” जर आपण १००% सामाजिक भेटीगाठी कमी करू शकलो तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची फैलाव साखळी प्रभावीपणे तोडू शकतो.”

दिल्ली पोलीसांनी सामान डिलिव्हरीचा आदेश घेतला मागे

दिल्ली पोलिसांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान आवश्यक वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या वाहनांना सूट दिली होती. कारण दिल्ली पोलिसांनी ऑनलाइन डिलिव्हरी सर्व्हिसला दिल्लीमध्ये त्यांच्या डिलिव्हरी ऑपरेशनची काही कंपन्यांनी परवानगी दिली होती. तथापि, काही वेळेनंतर या आदेशाला त्वरित प्रभावामुळे मागे घेतले गेले. दिल्ली पोलिसांनुसार, यात काही सुधारानंतर नवीन आदेश दिला जाईल.

You might also like