गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी, FIR नोंद

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन –   गोव्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. तसा मॅसेज त्यांच्या फोनवर आला आहे. या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्र्याचे स्वीय सचिव आत्माराम बर्वे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे धमकी देणारा कोण आहे, याचे नाव तक्रारीत नाही. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. 5732038836 या क्रमांकावरून धमकीचा मॅसेज आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या फोनचा तपशील मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पणजी पोलिसांनी या प्रकरणी कलम 504, 507 आणि 384 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे.