GPF वरील व्याजदर सरकारने घटविला, सरकारी नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने जनरल प्रॉविडेंट फंड (GPF) आणि इतर फंड च्या व्याज दर कमी केली आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सरकारने या फंड्सच्या व्याज दरात ०.१ टक्क्यांने कपात केली आहे. आता या फंडातून ७.९ टक्के व्याज मिळणार आहे. या आधीच्या तिमाहीत ८ टक्के व्याज दर ठेवण्यात आला होता. हा व्याज दर केंद्रीय कर्मचारी, रेल्वे आणि संरक्षण खात्यासाठी मान्य करण्यात आला आहे. आता हा फंड पब्लिक प्रॉविडेंंट फंडच्या व्याजदराबरोबर झाला आहे.

या फंडात लागू झाला आहे नवा व्याजदर
१. जनरल प्रॉविडेंट फंड
२. कंट्रीब्युटरी प्रॉविडेंट फंड
३. ऑल इंडिया सर्विसेज प्रॉविडेंट फंड
४. राज्य रेल्वे प्रॉविडेंट फंड
५. इंडियन ऑर्डिनेंस डिपार्टमेंट प्रॉविडेंट फंड
६. इंडियन नेवल डॉकयार्ड वर्कमेंस प्रॉविडेट फंड
७. डिफेंस सर्विसेज ऑफिसर्ज प्रॉविडेंट फंड
८. इंडियन नेवल डॉकयार्ड वर्कमेंस प्रविडेंट फंड
९. आर्म्ड फोर्सेज पर्सनल प्रॉविडेंट फंड

फायनेंशिअल सिस्टम मध्ये व्याज दर कमी झाले असे तरी सरकारने याआधी देखील लहान बचत योजनांवर व्याजदर जुलै सप्टेंबर तिमाहीत १० बेसिस प्वाईंटने कमी केले. म्हणजे आता पीपीएफ मध्ये देखील ८ टक्क्यांच्या ऐवजी ७.९ टक्के व्याजदर मिळणार आहे.

सरकारने अनेक बचत योजनांवर केलेल्या व्याजदर कपाती मुळे आता या गुंतवणूक करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कमी परतावा मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’