आता व्हीआयपींच्या सुरक्षेमध्ये तैनात असणार नाहीत ‘ब्लॅक कॅट’ कमांडो, सरकारनं पूर्णपणे हटवलं NSG कव्हर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – गांधी कुटुंबियांचं एसपीजी संरक्षण काढून घेतल्यानंतर आता सरकारने सर्व व्हीआयपींच्या संरक्षणामधून एसपीजी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अति महत्वाच्या लोकांना संरक्षण देण्याच्या कामातून आता राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना (NSG) दूर करण्यात येणार आहे. यापूर्वी गृह मंत्रालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे एसपीजी संरक्षण हटविण्यासह अनेक नेत्यांच्या संरक्षणात कपात केली आहे.

13 व्हीआयपींना एनएसजी कवच

अति महत्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणातून एसपीजीच्या ब्लॅक कॅट कमांडोजना दूर करण्याचा हा प्रकार सुमारे दोन दशकानंतर घडत आहे. 1984 च्या दंगलीनंतर जेव्हा एनएसजीची स्थापना झाली तेव्हा व्हीआयपींच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांची नव्हती. आधुनिक हत्यारांसह सज्ज असलेले हे खास दल व्हीआयपींना संरक्षण कवच देते. हे कवच सध्या झेड प्लस सुरक्षा असलेल्या 13 अति महत्वाच्या लोकांना देण्यात आले आहे. सर्व व्हीआयपींच्या संरक्षणासाठी सुमारे दोन डझन कमांडो तैनात रहात होते.

एनएसजीच्या सूत्रांनी सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संरक्षणासाठी असलेल्या एनएसजीची जबाबदारी लवकरच अर्धसैनिक दलाकडे दिली जाईल. या नेत्यांसह माजी सीएम मायावती, मुलायम सिंह यादव, चंद्रबाबू नायडू, प्रकाश सिंह बादल, फारूक अब्दुल्ला यांनाही एनएसजी संरक्षण मिळाले आहे. यासह आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनाही एनएसजी संरक्षण मिळाले आहे.

नेत्यांच्या संरक्षणाचे ओझे एनएसजीवर

गृह मंत्रालयाच्या सूत्रानुसार, एनएसजीचे मुख्य काम अँटी टेरर ऑपरेशन आणि विमान हायजॅक सारख्या घटना रोखण्याचे आहे. परंतु, महत्वाच्या लोकांना संरक्षण देण्याचे काम या विशेष दलावर ओझ्यासारखे आहे. यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. अधिकार्‍याने सांगितले की, या निर्णयामुळे एनएसजीचे सुमारे 450 कमांडो व्हीआयपींचे संरक्षण करण्याच्या कामातून मुक्त होतील. त्यांना त्यांचे मुळ काम देता येईल.

संरक्षण कवचातून दूर केल्यानंतर एनएसजीच्या पाच ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येईल, यामुळे गरज भासल्यास त्यांना त्यांचे काम देता येईल. सरकारच्या योजनेनुसार व्हीआयपींच्या संरक्षणाची जबाबदारी CISF आणि CRPF सारख्या अर्धसैनिक दलांना देता येऊ शकते. जे अगोदरच सुमारे 130 हाय प्रोफाईल लोकांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत.

नुकतीच CRPF ला अशा पाच अति महत्वाच्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली, ज्यांना यापूर्वी SPG कवच होते. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नीसह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संरक्षणाची जबाबदारीही याच सुरक्षा दलाकडे आहे. तर सीआयएसएफवर राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजीत डोभाल आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही संरक्षण देण्याची जबाबदारी आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/