तिहेरी तलाक : पीडितांना वर्षाला 6 हजार रूपये पेन्शन मिळणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहेरी तलाहसंबंधित केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना पुढील वर्षापासून पेंशन देण्याचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयानुसार तलाक पीडित महिलांना वर्षाला 6 हजार रुपये पेंशन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारने तयार केलेला प्रस्ताव पुढील कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एफआयआर किंवा फॅमिली कोर्टमधीली खटल्याच्या आधारावर ही पेंशन देण्यात येईल. राज्यातील सरकारने तिहेरी तलाक पीडित 5 हजार महिलांची नोंद घेतली आहे. पुढील टप्प्यात पीडित महिलांसाठी पेन्शनची योजना लागू करण्यात येईल.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पीडित महिलांना मदत करण्याची घोषणा केली होती. ज्या मुस्लीम महिलांना पतीने तिहेरी तलाक देऊन वाऱ्यावर सोडले आहे, त्या पीडित महिलांना सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देणार असल्याची घोषणा योगींनी केली होती. तिहेरी तलाक पीडित महिलांची भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली होती. यावेळी मुस्लीम महिलांसोबत हिंदू महिलांनाही न्याय देणार असल्याचे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/