केंद्र सरकारकडून ‘पेट्रोल-डिझेल’वरील ‘उत्पादन’ शुल्कात कमालीची वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. पेट्रोलवर प्रति लिटर 10 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 13 रुपयांची वाढ सरकारने केली आहे. ही शुल्कवाढ मध्य रात्रीपासून लागू झाली आहे.
The price hike will be absorbed by Oil Marketing Companies leading to no increase in retail prices of fuel at the pump. https://t.co/lTTXEDfgfd
— ANI (@ANI) May 5, 2020
पेट्रोलवर अतिरिक्त 2 रुपये उत्पादन शुल्क आणि 8 रुपये रस्ते कर लावून एकूण 10 रुपये प्रति लीटर असे शुल्क वाढवले आहे. तर डिझेलवर अतिरिक्त 5 रुपये उत्पादन शुल्क वाढवले आहे. तर 8 रुपये रस्ते कर लावून 13 रुपये प्रति लीटर शुल्कवाढ केली आहे. मार्चनंतर दुसऱ्यांदा सरकारने ही शुल्कवाढ केली आहे. मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 3 रुपयांची शुल्कवाढ करण्यात आली होती.
सरकारने उत्पादन शुल्क वाढवल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय दरातील घसरणीमुळे इंधन कंपन्यांनी या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा भार ग्राहकांवर न टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात कुठलीही वाढ होणार नाही. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याने त्याचा फायदा केंद्र सरकारला होणार आहे. यातून आलेला महसूल सरकारला पायाभूत सुविधांवर खर्च करता येणार आहे.