आता कधीच छापल्या जाणार नाहीत का 2000 रुपयांच्या नोटा ? सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हळूहळू 2000 रुपयांच्या नोटा चलनात कमी होत आहेत, यामागील एक मोठे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांत 2000 रुपयांच्या नोटा एटीएममधून कमी प्रमाणात काढल्या जात आहेत. अलीकडे असे अनेक अहवाल समोर आले आहेत की सरकारने 2000 रुपयांच्या नोटा छापण्यास बंदी घातली आहे. ज्यावर आता सरकारने संसदेत स्पष्टीकरण दिले आहे.

अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले की 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. लोकसभेत लेखी उत्तरात अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चा सल्ला घेतल्यानंतर विशिष्ट नोटांच्या छपाईचा निर्णय सरकार कडून घेतला जातो.

वित्त राज्यमंत्री म्हणाले की, सन 2019 -20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 2000 च्या नोटांच्या छपाईसाठी कोणतेही मागणी पत्र पाठवले नाही. परंतु असे असूनही सरकारने नोटांची छपाई थांबविण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ते म्हणाले की, 31 मार्च 2020 पर्यंत 2000 रुपयांच्या 27,398 लाख नोटा चलनात आल्या आहेत. मार्च 2019 पर्यंत 32,910 लाख नोटा चलनात आल्या. 2018 च्या अखेरीस असलेल्या 2000 च्या नोटांची संख्या 33,632 लाख होती.

रिझर्व्ह बँकेच्या सन 2019-20 च्या वार्षिक अहवालानुसार मार्च 2018 अखेर प्रचलित असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 33,632 लाख होती, जी मार्च 2019 अखेर 32,910 लाखांवर आली. मार्च 2020 च्या अखेरीस चलनात 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 27,398 लाखांवर गेली.

या अहवालानुसार मार्च 2020 च्या अखेरीस प्रचलित एकूण चलनात 2 हजारांच्या नोटांचा वाटा कमी होऊन 2.4 टक्के झाला आहे. मार्च, 2019 अखेरपर्यंत 3 टक्के आणि मार्च अखेर 2018 च्या अखेरीस 3.3 टक्के होता. या अहवालानुसार, 2018 पासून तीन वर्षात 500 आणि 200 रुपयांच्या नोटांच्या प्रसारात लक्षणीय वाढ झाली आहे. 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे प्रसारण किंमत आणि प्रमाण दोन्ही वाढले आहे.

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन दरम्यान नोटांची छपाई थांबविण्यात आली होती, असे केंद्रीय मंत्र्यांनी आरबीआयच्या हवाल्याने सांगितले. परंतु नंतर केंद्र तसेच राज्य सरकारांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता छपाई होत आहे. कर्मचार्‍यांमध्ये कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातील नाशिकमधील शासकीय मुद्रण कार्यालयात नोटांची छपाई तीनदा थांबवावी लागली होती.