1 मेपासून तरूणांनासुद्धा व्हॅक्सीन ! रजिस्ट्रेशन कसे करायचे, किती पैसे लागतील ? लस घ्यायची आहे तर जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आता 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला व्हॅक्सीन दिली जाणार आहे. देशात कोव्हॅक्सीन किंवा कोविशिल्डची लस दिली जात आहे. सरकारकडून अनेकदा सांगितले गेले आहे की व्हॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे ? यासाठी कोणती प्रक्रिया आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा व्यवस्था आहे का ? हे केंद्र सरकारने सांगितले आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये पहिल्या प्रमाणे मोफत लस दिली जाईल, तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सीनचे शुल्क 250 रुपये आहे.

1 मेपासून 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना व्हॅक्सीन दिली जाणार आहे, अशावेळी पुन्हा सर्व प्रक्रिया समजूल घेतली पाहिजे. मात्र, सर्वत्र व्हॅक्सीनचा तुटवडा असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, मोदी सरकरने योग्य तो साठा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे.

असे करा व्हॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन
आपला मोबाइल फोन किंवा कंम्प्यूटरच्या ब्राऊझरमध्ये https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉगिन करा. येथे मोबाइल नंबरसह रजिस्ट्रशेन करावे लागेल. पोर्टलद्वारे ठराविक वेळेत व्हॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. एका मोबाइल फोनवरून कमाल चार लोकांच्या व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाले नाही तर?
अनेक लोक डिजिटल फ्रेंडली नसतात. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येत नसेल तर सायबर कॅफेची मदत घ्या. किंवा जवळच्या व्हॅक्सिनेशन सेंटरवर जाऊन सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. याबाबत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही सांगितले आहे.

हे लक्षात ठेवा
* एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये बदल करू शकता. दुसर्‍या डोससाठी सेंटरसुद्धा निवडू शकता.

* ज्या कंपनीच्या व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्याच व्हॅक्सीनचा दुसरा डोस घ्या. कोविन सिस्टम व्हॅक्सीन उपलब्ध असलेले सेंटर दर्शवते.
* व्हॅक्सीनेशन पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट मिळेल.
* राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हे सर्टिफिकेट आवश्यक आहे.