Govt Jobs News | केंद्रीय विभागांमध्ये रिक्त असलेल्या सुमारे 10 लाख पदांसाठी होणार भरती, सरकारी नोकरी पाहिजे असणार्‍यांचे स्वप्न होणार पूर्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Govt Jobs News | देशातील केंद्रीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की 1 मार्च 2021 पर्यंत देशातील सर्व केंद्रीय विभाग आणि मंत्रालयांमध्ये सुमारे 9.79 लाख पदे रिक्त आहेत. या विभागांसाठी आणि मंत्रालयांसाठी मंजूर पदे जवळपास 40.35 लाख आहेत. (Govt Jobs News)

 

निरंतर प्रक्रियेनुसार केल्या जातील नियुक्त्या
खर्च विभागाच्या वेतन संशोधन युनिटच्या वार्षिक अहवालानुसार, 1 मार्च 2021 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये 40,35,203 मंजूर पदे होती. त्यापैकी सुमारे 9.79 लाख पदे रिक्त असून सुमारे 30,55,876 कर्मचारी पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्रीय विभागातील पदांवर नियुक्ती ही संबंधित विभागाची जबाबदारी असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असेही ते म्हणाले.

रिक्त पदांवर मिशन मोडमध्ये होतील नियुक्त्या
जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांसह संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयांमधील रिक्तपदे निवृत्ती, पदोन्नती, राजीनामा आणि मृत्यू इत्यादीमुळे निर्माण होतात. यावेळी त्यांनी संबंधित मंत्रालये आणि विभागांना रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करण्याची विनंती केली. (Govt Jobs News)

 

पीएम मोदींनी दिल्या रिक्त पदे भरण्याच्या सूचना
विशेष म्हणजे, पीएम नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील
दीड वर्षात रिक्त असलेल्या 10 लाख पदांवर नियुक्त्या करण्यास सांगितले होते.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया मिशन मोडवर करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले होते.

 

त्याचवेळी लोकसभेत आणखी एक माहिती देताना जितेंद्र सिंह म्हणाले की, 3 मार्च 2011 पर्यंत केंद्रीय विभागांमध्ये
नियुक्त केलेल्या एकूण 30,87,278 कर्मचार्‍यांपैकी 3,37,439 महिला कर्मचारी आहेत.
कामगार मंत्रालयाच्या रोजगार आणि प्रशिक्षण महासंचालनालयाने केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या जनगणनेनुसार त्यांनी ही माहिती दिली आहे.

 

Web Title :- Govt Job News | national recruitment to be done on approx 10 lakh posts lying vacant in central departments and ministries

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Stamp Duty | मुद्रांक शुल्क चुकविल्याच्या प्रकरणातील दंडात 90 टक्के सवलत जुलै अखेरपर्यंतच

 

Cyber Insurance Policy | ऑनलाईन फ्रॉडचे नुकसान टाळायचे असेल तर घ्या सायबर विमा पॉलिसी, जाणून घ्या तिचे फायदे

 

Pune -Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूर प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात, अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू