त्रिपुरा सरकारच्या विविध विभागात 1500 कनिष्ठ लिपीक पदासाठी भरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : संयुक्त भर्ती मंडळ, त्रिपुरा यांनी लोअर डिव्हिजन लिपिक पदासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार नियोजित तारखेपर्यंत लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जानेवारी २०२१ निश्चित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे त्रिपुरा सरकारच्या विविध विभागात एकूण १५०० कनिष्ठ लिपीक पदे भरली जातील.

अधिक माहितीसाठी
_रिक्त स्थान तपशील
१)एकूण पदांची संख्या – १५०० पदे
२)लोअर डिव्हीजन लिपिक (एलडीसी) ग्रुप सी – १५०० पदे

_महत्त्वाच्या तारखा
१)ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – १९ डिसेंबर २०२०
२)अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३० जानेवारी २०२१

_शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेतून माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याव्यतिरिक्त, उमेदवारांना संगणकावरील ऑपरेटिंग आणि कॉम्प्यूटरचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच संगणकावर इंग्रजीमध्ये प्रति मिनिट किमान 30 शब्दांची अचूक टाइपिंग गतीसह संगणकावर टाइप करण्यास त्याच्यात प्रवीणता असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत अधिसूचना लिंकवर क्लिक करा.

_वय श्रेणी
उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे ते कमाल ४१ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना त्रिपुरा सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

_अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार संचालनालय त्रिपुरा च्या अधिकृत वेबसाइटवर Https://Employment.Tripura.Gov.In भेट द्या. एप्लीकेशन लिंक एक्टिवेट झाल्यानंतर अर्ज करा. आपण त्रिपुरा एलडीसी भरती २०२० साठी १९ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकता.