Toll Tax वर मिळणाऱ्या सवलतीसंदर्भात सरकारनं बदलला नियम, आता केवळ ‘यांना’ मिळेल फायदा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महामार्गावर चालणाऱ्या लोकांना या वृत्ताविषयी माहिती असणे महत्वाचे आहे. कारण डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने टोल टॅक्स (Toll Tax) संदर्भात नियम बदलला आहे. महामार्गावरील प्रत्येक वाहनांच्या हालचालींवर आता फास्टॅग आवश्यक करण्याचा नवा मार्ग बनविण्यात आला आहे. टोल टॅक्स (Toll Plaza Discount) वर तुम्हाला कशी मिळणार सूट ते जाणून घेऊया…

सरकारने आता एक नियम बनविला आहे की आता केवळ त्यांनाच 24 तासात परत आल्यानंतर टोल टॅक्समध्ये सूट मिळेल, ज्यांच्या गाडीवर वैध फास्टॅग असेल. म्हणजेच जर तुम्ही रोख रक्कम देऊन टोल टॅक्स भरला तर तुम्हाला 24 तासात परत आल्यास टोल टॅक्समध्ये मिळणारी सूट मिळणार नाही.

फास्टॅग असल्यावरच मिळेल सवलत

अनेक टोल टॅक्सवर काही खास सवलती दिल्या जातात. उदाहरणार्थ, काही गाड्यांवर सवलतीच्या अंतर्गत टोल टॅक्स आकारला जात नाही, परंतु आता ही सवलत तेव्हाच मिळेल, जेव्हा त्यांच्यावर फास्टॅग लावलेला असेल. डिजिटल पेमेंट्स प्रोत्साहन देण्यासाठी हा नियम बनविला गेला आहे की देयक स्मार्ट कार्ड, फास्टॅग किंवा इतर कोणत्याही प्रीपेड इन्स्ट्रुमेंटद्वारेच होईल.

जेव्हा 24 तासांच्या आत एखादी व्यक्ती परत येते तेव्हा हा बदल त्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत सूट मिळवण्यासाठी अगोदर पासूनच कोणतीही पावती घेण्याची गरज भासणार नाही. जर ती व्यक्ती 24 तासात परत आली तर आपल्या फास्टॅग खात्यातून सूट लागू करून पैसे वजा केले जातील.