नोकरी बदलणाऱ्यांवर असणार आता सरकारची नजर, तयार होतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना रोजगाराची पूर्ण माहिती मिळणार आहे. कारण आता सरकार नवीम सिस्टम तयार करण्याची योजना बनवत आहे. नोकऱ्यांच्या किती संधी उपलब्ध आहेत हे देखील यामुळे समजणार आहे. यावर नजर ठेवण्यासाठी सरकार एका ट्रॅकिंग सिस्टीमवर काम करत आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटने (EPFO) द्वारे जारी करण्यात येणाऱ्या महिन्यांच्या डेटावरून नव्या नोकऱ्यासंदर्भातील माहिती उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी एक नोकरी सोडून दुसरी पकडली आहे त्याची माहिती ही या यंत्रणेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. जे लोक नेहमीच नोकऱ्या बदलत असतात त्यांची माहिती तात्काळ उपलब्ध होत नाही. याच पार्श्वभूमीवर ही ट्रॅकींग सिस्टीम प्रभावी ठरणार आहे.

याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगतिले की, “नोकऱ्या बदलणाऱ्यांची संख्या समजणं सध्या शक्य नाही. त्यासाठी चांगली व्यवस्था करण्याची गरज आहे. महिन्याचा डेटा 2018 पासून जारी करण्यात आलेला आहे. यात सप्टेंबर 2017 चीही माहिती दिलेली आहे. परंतु त्यात काही कमतरता आहे. त्यामुळे नव्या उत्पन्न होणाऱ्या नोकऱ्यांसंदर्भात माहिती मिळत नाही.”

“आजमितीस पाहता बऱ्याच संघटना या मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेसच्या या नियमाच्या बाहेर आहेत. ज्यांचा पगार 15 हजार रुपये आहे, ते ईपीएफओच्या अंतर्गत येत नाहीत. मुख्य म्हणजे 20 किंवा त्याहून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या संघटना किंवा कंपन्या या कर्मचारी भविष्य निधीच्या अंतर्गत येतात. नोटाबंदी आणि जीएसटी लागू केल्यानंतर संघटीत क्षेत्राचा आकार वाढला आहे.”

ईपीएफओची सदस्यसंख्या 17 महिन्यांच्या उच्च स्तरावर असून जानेवारीपर्यंत 8,96,000 जास्त झाली आहे. 2017-18मध्ये देश बेरोजगारी 45 वर्षांच्या उच्चस्तरावर आहे. देशातील वाढत्या बरोजगारीमुळे सरकारवर टीका होत आहे. या सर्वामुळेच सरकारनं देशात रोजगार वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.