1 सप्टेंबर पासुन वाहतूक नियमांमध्ये बदल ! कोणत्या ‘रूल’चं उल्‍लंघन केल्यास किती दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास पूर्वीपेक्षा अधिक दंड द्यावा लागणार आहे. राज्य सरकारांवर या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव नसला तरी त्यांनी अंमलात आणल्यास केंद्र सरकार मदत करेल. जाणून घ्या नियम मोडल्यास किती दंड द्यावा लागणार याविषयी –

1 सितंबर से बदलेंगे ट्रैफिक नियम, जानें किस बात पर होगा कितना जुर्माना

1) नव्या कायद्यांतर्गत लायसन्स नसणाऱ्या वाहनांच्या अनधिकृत वापरासाठी 1,000 रुपयांपर्यंत असणारा दंड आता 5,000 रुपये करण्यात आला आहे. लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास होणारा दंड वाढला असून आता 5,000 रुपये दंड द्यावा लागेल. त्यामुळे गाडी चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

1 सितंबर से बदलेंगे ट्रैफिक नियम, जानें किस बात पर होगा कितना जुर्माना

2) नव्या नियमांतर्गत दारूच्या नशेत वाहन चालवल्याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यांचा तुरूंगवास आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास 2 वर्ष तुरूंगवासाची तर 15 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास त्याला 10,000 रुपये दंड भरावा लागेल, पूर्वी 500 रुपये दंड भरावा लागत होता.

1 सितंबर से बदलेंगे ट्रैफिक नियम, जानें किस बात पर होगा कितना जुर्माना

3) एखाद्या अल्पवयीन मुलाने काही अपराध केल्यास पालक किंवा मालक दोषी असतील. त्यासाठी 25 हजार रुपये दंड आणि 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वाहनाचा नोंदणी क्रमांक देखील रद्द केला जाऊ शकतो.

1 सितंबर से बदलेंगे ट्रैफिक नियम, जानें किस बात पर होगा कितना जुर्माना

4) सीट बेल्ट लावला नाही तर दंड 100 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुचाकी वाहनावर ओव्हरलोडिंग केल्यास 100 रुपयांपासून वाढवून 2000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात येईल. इन्शोरन्सशिवाय वाहन चालविण्यास 1000 रुपये असणारा दंड 2000 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

1 सितंबर से बदलेंगे ट्रैफिक नियम, जानें किस बात पर होगा कितना जुर्माना

5) ओव्हरस्पीडवरील दंड 400 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर दुसरीकडे धोक्याची ड्रायव्हिंग करणाऱ्यावर दंडाची रक्कम 5000 पर्यंत करण्यात आली आहे. यापूर्वी 1000 रुपये दंड आकारला जात होता. ड्रायव्हिंग करताना शर्यत लावल्यास 5000 पर्यंत दंड आकारण्यात येईल. यापूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता.

1 सितंबर से बदलेंगे ट्रैफिक नियम, जानें किस बात पर होगा कितना जुर्माना

6) वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. यासह प्रवाशांच्या ओव्हरलोडिंगसाठी प्रति राईडला 1000 रुपये दंड तर आपत्कालीन कारला मार्ग न दिल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल.

1 सितंबर से बदलेंगे ट्रैफिक नियम, जानें किस बात पर होगा कितना जुर्माना

सरकारने मोटार वाहन संशोधन अधिनियम 2019 च्या 63 तरतुदींना अधिसूचित केले आहे. वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते मंत्रालयाने इतर तरतुदींसाठी नियमांच्या मसुद्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल.

आरोग्यविषयक वृत्त –