सव्वादोन लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणी छापा टाकून सव्वादोन लाख रुपयांचा गुटखा व इतर बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहीती मिळाली की, माहिजळगाव, ता.कर्जत येथे महेंद्र अण्णा जाधव हा त्याचे जाधव पान सेंटर व झुंबर नामदेव भिसे हा त्याचे गुरुकृपा पान सेंटर मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला आदी तंबाखुजन्य पदार्थ स्व:ताचे कब्जात बाळगून विक्री करतो. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशावरून यांच्या पथकातील पोहेकॉ/बाळासाहेब मुळीक, संभाजी कोतकर, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विश्वास बेरड, पोकॉ/कमलेश पाथरुट यांनी सहा. आयुक्त अन्न औषध प्रशासन कार्यालय अ.नगर यांना फोन वरुन सदर बातमीतील हकिगत कळविली.

माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकून महेद्र अण्णा जाधव (वय ३०, रा. माहिजळगाव, ता कर्जत) व झुंबर नामदेव भिसे (वय ५१, रा. माहिंजळगाव, ता कर्जत) यांना ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातुन २ लाख १८ हदार ३२०/- रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला इ. तंबाखुजन्य पदार्थ व मावा तयार करण्याचे मशिन जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलिसांकडून सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त