पुण्यातील ‘सीरम’ला केंद्र सरकारकडून 1 कोटी ‘कोविशिल्ड’ लशीची दुसरी ऑर्डर

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील प्रभावी लस म्हणून ‘सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया’ने निर्मिती केलेल्या लसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यापूर्वी सरकारकडून ‘सीरम’ची लस खरेदी करण्यात आली होती. पण त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी ऑर्डर देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने गेल्या महिन्यात 11 जानेवारीला 1.1 कोटी कोव्हिशिल्ड या कोरोनावरील लसीची मागणी केली होती. त्यासाठी 231 कोटींची रक्कमही देण्यात आली होती. पण आता सीरम इन्स्टिट्यूला सरकारकडून पुन्हा एका ऑर्डर मिळाली आहे. मात्र, त्यासाठी 441 कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत.

‘सीरम’ने विकसित केलेली कोरोनावरील लशीला भारतातूनच नाहीतर जगभरातून मागणी वाढली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही सीरमकडे लसीची मागणी केली आहे.

कोरोनावर प्रभावी कोव्हिशिल्ड

दरम्यान, सीरमने निर्मिती केलेली कोव्हिशिल्ड ही लस कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचे केलेल्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

‘सीरम’मुळे जगभरात भारताचे नाव

कोरोनावरील लस म्हणून कोव्हिशिल्डकडे मोठ्या आशेने जगाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या काळात याच सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीमुळे भारताचे नाव संपूर्ण जगभरात उंचावले.

‘सीरम’ची कोव्हिशिल्ड तर भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’

भारताकडून निर्मिती केलेल्या दोन लशींच्या आपातकालीन वापराला सरकारने मान्यता दिली आहे. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड तर भारत बायोटेक या कंपनीकडून कोव्हॅक्सिन या लशीचा वापर केला जात आहे.