अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभाग प्रमुखाची हकालपट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. अग्रवाल यांचा कार्यकाळही तीन वर्षांनी कमी करण्यात आला आहे.

विनीत अग्रवाल यांनी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यमुक्त केले होते. विनित अग्रवाल यांच्या या निर्णयामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, २९ मार्च रोजी संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना निरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवण्याचे आदेश देण्यात आले होते.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने मंजुरी दिल्यानंतर मंगळवारी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर ईडीने अग्रवाल याची विशेष संचालक पदावरून हाकालपट्टी करण्याचे आदेश दिले. अग्रवाल यांच्यानंतर मुंबईच्या संचालकांचा कारभार चेन्नईतील विशेष संचालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांना गृह विभागात पाठवण्यात आले आहे. मुंबईतील ईडीचा विशेष संचालक हा पश्चिम विभागाचा प्रमुख असतो. महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर त्याचे नियंत्रण असते. अग्रवाल यांना २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले होते. २९ मार्च रोजी संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना नीरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवल्यानंतर अग्रवाल चर्चेत आले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like