WhatsApp ला सरकारने सुनावले – ‘गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर, परंतु गंभीर प्रकरणात माहिती द्यावी लागेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअप भारत सरकारच्या सोशल मीडिया गाईडलाईनच्या विरोधात हायकोर्टात गेले आहे. व्हॉट्सअपने म्हटले होते की, व्हॉट्सअपवर कोणताही मेसेज ट्रेस केला जाऊ शकत नाही.

सरकारची गाईडलाईन आहे की, आवश्यकता पडल्यास व्हॉट्सअपला मेसेजचा ओरिजन यूजर सांगावा लागेल. म्हणजे मेसेज ट्रेस करावा लागेल. व्हॉट्सअपने यूजर्सचे मेसेज ट्रेस करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सरकारने ताज्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, अशाप्रकारची आवश्यकता त्या प्रकरणांमध्ये भासते जेव्हा एखादा मेसेज रोखायचा असेल किंवा त्याचा तपास करायचा आहे. अशा स्थितीत सुद्धा मेसेजची आवश्यकता असू शकते की, कुणी गंभीर गुन्हा करू शकतो ज्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे.

स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, भारताची सार्वभौमत्व, अखंडता किंवा दुसर्‍या देशांसह फ्रेंडली रिलेशनमध्ये काही समस्या आली तर अशावेळी मेसेजच्या ओरिजनलची आवश्यकता असेल.

याशिवाय रेप, सेक्श्युअल मेटेरियल किंवा चाईल्ड सेक्श्युअल अब्यूज मेटेरियलच्या तपासासाठी सुद्धा याची आवश्यकता असेल.

व्हॉट्सअप हे म्हणत आहे की, असे केल्याने यूजर्सच्या प्रायव्हसीसोबत तडजोड होईल. यावर सरकारचे म्हणणे आहे की, भारत सरकार राईट टू प्रायव्हसीचा आदर करते आणि सर्वांना प्रायव्हसी मिळण्यासाठी कटिबद्ध आहे.

व्हॉट्सअपचे म्हणणे आहे की, एखाद्या मेसेजचा ओरिजनल ट्रेस करण्याचा अर्थ व्हॉट्सअपच्या सर्व यूजरचे मेसेज ट्रेसमध्ये ठेवावे लागतील आणि यासाठी डेटाबेस तयार करावा लागेल. यामुळे यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येईल आणि यूजर्सचा जास्त डेटा सुद्धा कंपनीकडे असेल.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यानुसार सोशल मीडिया गाईडलाईन्सद्वारे व्हॉट्सअपच्या नॉर्मल फंक्शन्सवर कोणताही फरक पडणार नाही. तसेच याचा सामान्य यूजर्सवर फरक पडणार नाही.

मात्र, व्हॉट्सअपने हे क्लियर केले आहे की, जर ही नवीन गाईडलाईन लागू करण्यात आली तर यामुळे व्हॉट्सअप यूजर्सच्या प्रायव्हसीशी तडजोड होईल. कारण यासाठी एंड टु एंड एन्क्रिप्शनला बायबास करावे लागेल.