‘सेव्हिंग’ अकाऊंटमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांबाबत मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार ! अर्थ मंत्र्यांचे संकेत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMC बँक आणि इतर बँकांवर असलेले आर्थिक संकट पाहता केंद्राकडून बँक खातेदारांना त्यांच्या जमा रक्कमेवर मिळणाऱ्या गॅरंटीची मर्यादा वाढवली जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत संकेत दिले आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितले की या संबंधित बँक डिपॉजिट गॅरंटी विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल. बँक डिफॉल्टनंतर आता डिपॉजिट इंश्योरेंस अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून DICGC निश्चित नियमानुसार, ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा गॅरंटी मिळते.
काय आहे नियम
1) DICGC कडून निश्चित नियमांनुसार ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा गारंटी मिळते. हे नियम बँकेच्या सर्व शाखेत लागू होतात.
2) यात मूळ रक्कम आणि व्याज दोन्ही रक्कमांचा समावेश असेल. ही रक्कम दोन्ही मिळून 1 लाख पेक्षा जास्त आहे तर फक्त 1 लाखच सुरक्षित मानन्यात येतील.
3) सोप्या भाषेत बँकेत तुमची एकूण रक्कम 4 लाख आहे तर बँकेच्या डिफॉल्ट करण्यावर तुमचे फक्त 1 लाख सुरक्षित मानले जातील. बाकी रक्कम मिळण्याची गॅरंटी नाही.
आता काय होऊ शकते
काही रिपोर्टनुसार सरकार बँकेत जमा पैशांच्या गारंटीवर 1 लाख रुपयांची सुरक्षा गारंटी वाढवून 3 लाख रुपये करण्यात येईल. हिवाळी अधिवेशनात या संबंधित विधेयक सादर केले जाऊ शकते.
गॅरंटी रक्कम वाढवल्याने बँकांना देखील फायदा
काही रिपोर्टनुसार सरकारला वाटत आहे की बँकेत ग्राहकांच्या जमा रक्कमेची गॅरंटी वाढेल. यावर अर्थमंत्रालयात विचारविमर्श सुरु आहे आणि लवकरच घोषणा करण्यात येईल.
गारंटी रक्कम वाढवण्यासाठी सरकारला अनेक फायदे होती. एकतर बँकेत लोक गॅरंटी रक्कमेच्या बरोबरीने पैसे जमा असल्याने चिंतेत नसतील. यामुळे लोकांचा बँक सिस्टिमवर विश्वास वाढेल. यामुळे बँकांमध्ये होणारी सेविंग वाढेल आणि ते जास्त कर्ज देऊ शकतील.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय