जनधन अकाऊंटमध्ये 500 रूपयांचा शेवटचा हप्ता 10 जूनपर्यंत, दिवसाच्या हिशोबांनी येणार पैसे, जाणून घ्या
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन 1.0 नंतर केंद्र सरकारने महिला जन धन खात्यात तीन महिने 500-500 रुपये रोख टाकण्याची घोषणा केली होती. एप्रिलमध्ये पहिला हप्ता, मे मध्ये दुसरा हप्ता आणि आता तिसरा हप्ता 5 जूनपासून सुरू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटाच्या वेळी गरिबांना थेट मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने 26 मार्च रोजी महिलांच्या जनधन खात्यात एप्रिल महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंत दरमहा 500 रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. त्याचा आता तिसरा हप्ता 5 जूनपासून सुरू झाला असून दहा जूनपर्यंत हा निधी देण्यात येणार आहे. महिला जनधन खात्यात हा शेवटचा हप्ता पाच टप्प्यात टाकला जाईल. लाभार्थी बँक शाखेत जाऊन एटीएममधून पैसे काढू शकतील.
सरकारने महिला खातेधारकांना आवाहन केले कि, घाईगडबडीत एकत्र पैसे काढण्यासाठी बँकेत धाव घेऊ नये. पैसे काढताना किंवा एटीएमवर सामाजिक अंतराचे अनुसरण करा. गर्दी टाळण्यासाठी सरकार बँक खात्यात मदत रक्कम 5 टप्प्यात टाकत आहे. नियमानुसार ज्या महिला जन धन खातेधारकांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक 0 किंवा 1 आहे, त्याच्या खात्यावर 5 जून रोजी पैसे पोहोचले असतील . ज्यांचा खात्याचा शेवटचा क्रमांक 2 किंवा 3 आहे, त्यांच्या खात्यात 6 जून रोजी पैसे टाकले आहेत. त्याचबरोबर ज्या लाभार्त्यांचा खाते क्रमांत शेवटी 4 किंवा 5 आहेत, त्याच्या खात्यावर 8 जून रोजी पैसे पोहोचतील. ज्यांच्या खात्याची शेवटची संख्या 6 किंवा 7 आहे, ते 9 जून रोजी बँकेतून पैसे काढू शकतात. त्यांनतर शेवटच्या दिवशी म्हणेजच 10 जून रोजी, त्या महिलांच्या जन धन खात्यात पैसे जोडले जातील, ज्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटी संख्या 8 किंवा 9 आहेत.
कोरोना महामारीच्या काळात जनधन बँक खाते गरिबांसाठी उपयुक्त ठरत आहे. लॉकडाऊन दरम्यान गरिबांना आपले घर चालविण्यात आर्थिक अडचण येऊ नये. त्यामुळे हे पैसे पाठविले जात आहेत. जर आपण अद्याप जनधन खाते उघडलेले नसेल तर आपण जवळच्या सरकारी किंवा खासगी बँकेत जाऊन शून्य शिल्लक वर हे खाते उघडू शकता. दरम्यान, देशात लॉकडाऊन झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या कि, गरीब महिलांच्या जनधन खात्यात दरमहा 500 रुपये जोडले जातील. एकूण जनधन खात्यांपैकी 53 टक्के महिलांच्या नावे आहेत. सध्या देशात 38.57 कोटी लोकांचे जनधन खाते आहेत. त्यापैकी सुमारे 20.05 कोटी महिलांचे जनधन खाते आहेत.