११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत मोठा निर्णय होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – ११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत काहीतरी मोठा निर्णय होणार आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी फसवणार नाहीत असा विश्वास पद्मविभूषण जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांनी व्यक्त केला आहे. विश्व हिंदू परिषदेने आज राम मंदिराच्या निर्माणासाठी अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केलं आहे. यावेळी स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांनी हा दावा केला आहे.

केंद्र सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्यांने नाव न सांगण्याच्या अटीवरून मला आश्वासन दिलं आहे. राम मंदिराच्या मुद्यावर आमच्यात जवळपास 10 मिनिट चर्चा झाली. 11 डिसेंबरनंतर कदाचित राम मंदिराबाबत अध्यादेश किंवा ठोस निर्णय होऊ शकतो. सरकार ६ डिसेंबरलाच काहीतरी करणार होतं, मात्र आचारसंहितेमुळे त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. असा दावा स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे. तसंच, पंतप्रधान मोदी आम्हाला फसवणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विश्व हिंदू परिषदेने आज राम मंदिराच्या निर्माणासाठी अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केलं आहे. या सभेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून लाखो लोकं या धर्मसभेसाठीस जमा झाले आहेत.