GPRS in School Bus Mandatory | महाराष्ट्रात प्रत्येक स्कूलबसमध्ये आता ‘GPS’ बसवणे अनिवार्य; अप्पर पोलीस महासंचालकांनी दिल्या परिवहन विभागाला सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – GPRS in School Bus Mandatory | महाराष्ट्रात आता प्रत्येक ‘स्कूलबसमध्ये (School Bus) ‘जीपीएस’ (GPS) बसवणं बंधनकारक असणार आहे. राज्यात स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकाकडून (Addl DGP) (वाहतूक) परिवहन विभागाला (Department of Transportation) देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे आता पालकांना एक दिलासा मिळाला आहे.

 

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्कूल बसच्या नियमावलीची सक्तीने अंमलबजावणी करण्याची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून (Vidyarthi Sena of Maharashtra Navnirman Sena) करण्यात आली होती. याची दखल आता पोलीस विभागानं (Police Department) घेतली आहे. यामुळे आता स्कूल बसची नियमावली कडक करण्याच्या सूचना थेट अप्पर पोलीस महासंचालकानी दिल्या आहेत. (GPRS in School Bus Mandatory)

 

जून महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष (New Academic Year) सुरू होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू असलेल्या बस सेवांमधील त्रुटी दूर करण्याची आवश्यक असल्याची मागणी पालकांकडून केली जातेय.
यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्कूल बसमध्ये जीपीएस (GPS) असणे अनिवार्य असणार आहे.
त्याचबरोबर बस चालक आणि मदतनिसांची पोलीस पडताळणी करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

 

Web Title :-  GPRS in School Bus Mandatory | it is now mandatory to install gprs in school buses notice of upper director general of police to transport department

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा