आमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री बनली ‘साध्वी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘लगान’ मधून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री ग्रेसी सिंहने २० जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. पहिलाच चित्रपट सुपरहिट झाली तरही ती इंडस्ट्रीमधून गायब झाली. चित्रपटात येण्याच्या आधी ग्रेसी टीव्ही सीरियलमध्ये दिसून आली आहे. १९९७ मध्ये झी-टीव्हीवरील सीरियल ‘अमानत’ मध्ये ग्रेसीने डिंकीची भूमिका साकारली होती. अनेक सीरियलमध्ये काम केल्यानंतर तिला ‘लगान’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

image.png

डायरेक्टर आशुतोष गोवारिकरला चित्रपट ‘लगान’ मध्ये क्लासिकल डान्स करणारी अभिनेत्री हवी होती जी गावातील मुलींसारखी दिसेल. ऑडीशनला जेव्हा ग्रेसी पोहचली तेव्हा शेकडो मुलींमध्ये तिला सिलेक्ट करण्यात आले. या चित्रपटानंतर असे वाटले की, तिचे करिअर खूप चांगले होईल.

ग्रेसी सिंह

एका मुलाखतीमध्ये ग्रेसी सिंहने सांगितले की, तिला क्लासिकल डान्सर बनायचे होते पण ती अभिनेत्री झाली. तिचे स्वप्न होते की, एकदा असे करायचे की, चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कायमचे नाव झाले पाहिजे. यामुळे जेव्हा ‘लगान’ चित्रपटात तिला हिरोईन बनण्याची संधी मिळाली तेव्हा त्या रोलमध्ये ग्रेसी इतकी रमली होती की, शुटिंगमध्ये आजुबाजुच्या लोकांसोबत ही बोलायला वेळ नव्हता.

ग्रेसी सिंह

ग्रेसी सिंहने प्रकाश झा यांचा चित्रपट ‘गंगाजल’ मध्ये अजय देवगनसोबत काम केले होते. चित्रपटामध्ये तिचा रोल खूप छोटा होता. यानंतर तिने २००४ मध्ये ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्ये संजय दत्तसोबत काम केले. या रोलमुळे तिला काही फायदा झाला नाही. कालांतराने चित्रपट मिळाले नाही म्हणून ग्रेसीने बी ग्रेडचे चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये तिने कमाल आर खान म्हणजे केआरकेचा चित्रपट ‘देशद्रोही’ केला.

ग्रेसी सिंह

चित्रपटांमध्ये संधी न मिळाल्यामुळे ग्रेसीने टीव्हीवर एन्ट्री केली. तिने ‘संतोषी मां’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आपल्या या भूमिकेमधून ग्रेसी सिंहला एक खास ओळख मिळाली. टीव्हीसोबत ग्रेसी सिंहने २००९ मध्ये डान्स अॅकडमी सुरु केली. जिथे ती डान्स शिकवते.

सध्या ग्रेसी सिंह अध्यात्मिक प्रवचनमध्ये आपले वेळ घालवित आहे. ती ब्रह्मकुमारी अध्यात्मिक संघटनेची सदस्य आहे आणि जास्त वेळ ग्रेसी अध्यात्मिक ट्रेनिक घेण्यात घालिवते.

ग्रेसी सिंह

रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनूसार, ब्रह्मकुमारी संस्थेची सदस्य झाल्यानंतर ग्रेसी सिंहने लग्न केले नाही. एका मुलाखतीमध्ये ग्रेसीने सांगितले की, तिने स्वतःसाठी कोणताही प्लॅन केला नाही. परिवारचे लग्नासाठी बोलत असतात पण तिने अजून या गोष्टीचा विचार केला नाही.

ग्रेसी सिंह

आरोग्यविषय वृत्त –