Grahan 2021 : नवीन वर्षात किती सूर्य आणि चंद्र ग्रहण, कोणत्या देशांवर परिणाम ?, दिवस-तारीख सुद्धा जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2021 वर्ष सुरू होण्यासाठी आता थोडा कालावधी बाकी राहीला आहे. नवीन वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने सुद्धा खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की, पुढील वर्षी दोन चंद्र ग्रहण आणि दोन सूर्य ग्रहण लागणार आहेत. ही चारही ग्रहण केव्हा लागतील आणि कोणत्या देशांवर यांचा सर्वात जास्त परिणाम होईल ते जाणून घेवूयात.

2021 चे पहिले सूर्य ग्रहण
पहिले सूर्य ग्रहण वर्षाच्या मध्यावर म्हणजे 10 जून 2021 ला लागेल. हे ग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, यूरोप आणि आशियामध्ये आंशिक, तर उत्तर कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये पूर्ण रूपात दिसेल. भारतात हे ग्रहण आंशिक रूपात दिसेल.

2021 चे दूसरे सूर्य ग्रहण
2021 चे दूसरे सूर्य ग्रहण 4 डिसेंबर 2021 ला लागेल. या ग्रहणाचा परिणाम अंटार्कटिका, दक्षिण अफ्रीका, अटलांटिकचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत होईल. मात्र, भारतात या सूर्य ग्रहणाची दृश्यता शून्य असेल, यासाठी भारतात याचा सूतक काळ प्रभावी असणार नाही.

2021 चे पहिले चंद्र ग्रहण
2021 चे पहिले चंद्र ग्रहण बुधवारी 26 मे 2021 ला लागेल. हे ग्रहण दुपारी सुमारे 2 वाजून 17 मिनिटांपासून सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांपर्यंत लागेल. हे एक पूर्ण चंद्र ग्रहण असेल, जे पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर आणि अमेरिकेत पूर्ण चंद्र ग्रहणाप्रमाणे दिसेल. भारतात हे केवळ एक उपछाया ग्रहणाप्रमाणे दिसेल.

2021 चे दुसरे चंद्र ग्रहण
2021 चे दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण शुक्रवार, 19 नोव्हेंबरला लागेल. ग्रहण दुपारी सुमारे साडे अकरा वाजल्यापासून सांयकाळी 5 वाजून 33 मिनिटांपर्यंत राहील हे एक आंशिक चंद्र ग्रहण असेल, ज्याची दृश्यता भारत, अमेरिका, उत्तर यूरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रात असेल.

2020 चे शेवटचे सूर्य ग्रहण
या वर्षीचे शेवटचे सूर्य ग्रहण 14 डिसेंबरला लागणार आहे. हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सायंकाळी 7:03 पासून 15 डिसेंबरला मध्यरात्री म्हणजे 12: 23 मिनिटापर्यंत राहील. सूर्य ग्रहणाचा कालावधी 5 तासांचा राहिल.